निशब्द - भाग 4

  • 11.6k
  • 1
  • 6.3k

माझा हात तिच्या हातात होता ..दोघांचे डोळे एकमेकांवर टिपलेले आणि हृदयात धडधड हा क्षण कसा विसरणार बरं !! तिचा हात माझ्या हातात होता.. उत्तरही न सांगताच मिळणार होतं पण तेव्हाच मला तिच्या हाताला काहीतरी लागून दिसलं ..मी तिला बाजूला बसविलं.. " श्रेयसी हे काय आहे " , मी घाबरून विचारलं ... आज कधी नव्हे ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती ..आज तिचे हुंदके मनाला यातना पोहोचवत होते.. शेवटी मी तिच्या डोळ्यावरून हात घ्यावे आणि ती शांत झाली ..काही वेळात तिने आपला अबोला तोडला ..विश्वास तू नेहमी विचारतोस ना की मी एवढी शांत का असते ? ..