त्याला जर या सर्वांचे खून करायचे असते तर त्याने इतकी घाई केली नसती, म्हणजेच त्याला सगळ्यांना एका वर्षातच मारायचे आहे... पहिला खून जुलै महिन्यात झाला... म्हणजेच येत्या जूनपर्यंत त्याला नीलम यांना माराव लागेल... पण त्यांचा वाढदिवस कधी असतो ते कळलं तर बर होईल आपल्याला.... , अभी... त्या कोण आहेत हे सुद्धा माहित नाही, त्या कशा दिसतात हे माहित नाही. मग तू कसा वाचवणार त्यांना ? , मला वाटते , आपण वृत्तपत्र संपादकांना याबद्दल विचारायला हवं, त्यांना १२ वर्षापूर्वीची माहिती असेलच ना.. तसे ते दोघेही एका वृत्तपत्र कार्यालयात पोहोचले आणि त्याच्या संपादकाला भेटले.