माथेरान आणि आठवणी

(19)
  • 14.1k
  • 1
  • 4.8k

पाऊस म्हटला जी आठवणी आल्याच. पाऊस म्हणजे आनंद. पाऊस म्हणजे जगणे. किती ही बोललं पावसाबद्दल तरीही ते कमीच. बाहेर पाऊस कोसळायला लागला की आठवणी ताज्या होऊन जातात. तशीच एक आठवण ती म्हणजे "माथेरान." मी माझ्या बहिणीच्या ग्रुप सोबत गेलेले. पावसाळा आला की चालु होतात त्या पावसाळी ट्रिप्स. तशीच आमची "माथेरानची ट्रिप." सकाळी लवकर सकाळची ट्रेन पकडून आम्ही ठाणे स्टेशन गाठलं. सकाळची सहा पंधराची ट्रेन पकडुन आम्ही सात तेवीस पर्यंत नेरळ ला पोहोचलो. त्या ट्रेनबाहेर मला दिसत होता तो रिमझिम बरसणारा पाऊस. ट्रिप्स म्हटल्या की पाऊस हा हवाच नाही....!! नजर जाईल तिथं पर्यंत फक्त हिरवळ दिसत होती. पावसाने सर्वांना जणू