मी एक अर्धवटराव - 2

  • 6.6k
  • 1
  • 3.5k

२) मी एक अर्धवटराव! दिवसागणिक मी मोठा होत होतो. आईच्या म्हणण्यानुसार जसे माझे वय वाढत जात होते तसतसे जन्मतःच मला चिकटलेले गुण अधिकच घट्ट होत होते. इतके की, मी काही तरी कारण काढून जेवायचेही टाळत असे. नानाविध कारणे सांगून शाळेत जायचेही टाळत होतो. परंतु घरच्यांचा दट्ट्या आणि गुरुजींचा रट्टा यामुळे उशिराने का होईना शाळेत जात असे. पूर्ण वेळ शाळा कधी केलीय हे मला आठवत नाही. मात्र गुरुजी म्हणत तसा मी एकपाठी होतो. अभ्यासात विशेष परिश्रम न करताही मी सदैव पन्नास-साठ टक्के गुण मिळवत असे. आठव्या वर्गात शिकत असतानाची एक घटना माझ्या कायम स्मरणात आहे. ती गोष्ट आठवली