चांदणी रात्र - ५

  • 9.6k
  • 7k

आज रविवार होता. राजेशचा गावातला मित्र गणेश आज पुण्यात आला होता. त्याला कपडे खरेदी करायचे होते. त्यामुळे राजेशचा पूर्ण दिवस गणेशबरोबर फिरण्यातच गेला. गणेश रात्री राजेशच्याच फ्लॅटवर राहिला व सकाळी लवकर घराबाहेर पडला. राजेशनेच त्याला स्वारगेटला सोडलं. पण त्यामुळे आज त्याला बर्वे उद्यानात जाता नाही आलं. त्यामुळे राजेशला आज फार चुकल्यासारखं वाटत होतं. व्यायाम करायचा राहिल्यामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे तो थोडा मलूल झाला होता. घरी परत येताच राजेशने झटपट आवरलं व नेहमीप्रमाणे तो संदीपच्या घरासमोर येऊन थांबला. संदीप व राजेश कॉलेजला पोहोचले. पहिल्या तासाची बेल वाजली व जाधव सर वर्गात आले. राजेशने आजूबाजूला पाहिलं. वृषाली कुठेच दिसत नव्हती. मुलांची