ये ग गौराबाई - ३ - Last part

  • 6.3k
  • 2.3k

सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला, तुझ्या बायकोला सांग मला न्हाऊ घाल असे म्हणाली. देवाला गोडधोड नेवेद्याचे कर, नाही काही म्हणू नको, नेहेमीचे रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला, बायकोला हाक मारली, अगं अगं ऐकलेस का ? आजीबाईला न्हाऊ घाल मी भिक्षा मागून येतो नेवेद्यासाठी असे सांगितले. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व गोडधोड स्वयंपाक केला नेवेद्य दाखवला . मुलबाळसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी, आजी, दूध कोठून आणू ? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको.