जयंता - 1

(14)
  • 21.7k
  • 1
  • 18.1k

“जयंता, तू पास होशीलच पुढे काय करणार तू ? तुझा मोठा भाऊ तर चळवळीत गेला. तुझ्या मनात काय आहे ? वडिलांनी विचारले.” “चळवळीचा भर ओसरला आहे. माझे तिकडे लक्ष नाही. मी लहान मुलगा. कोठे जाणार ? परंतु मला खूप शिकायची इच्छा आहे.” “कॉलेजचा खर्च कसा भागवायचा, बाळ ? “बाबा, मला नादारी मिळेल. मला मार्क्स चांगले मिळतील. कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीही कदाचित मिळेल. कॉलेजच्या शिक्षणाचा तुमच्यावर भार पडणार नाही.”