निशब्द - भाग 3

  • 11.5k
  • 7.1k

आता खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला सुरुवात झाली होती .. दिवसेंदिवस मित्रांची संख्या वाढत होती ..क्लास च्या बाहेर निघाल्यानंतर फक्त कॉलेजचे गेट पार करण्यासाठी पंधरा मिनिटे लागावी अशी ती वेळ होती .. श्रेयसी आणि मी अगदी मनाने एकमेकांच्या जवळचे झालो होतो .. विचार करता प्रत्येक गोष्टीत आम्ही स्पर्धक होतो पण प्रत्यक्षात मात्र एकमेकांच्या गुणांना साथ देणारे पक्के मित्र झालो ..वेगवेगळ्या वादविवाद , वक्तृत्व , निबंध स्पर्धा मध्ये भाग घेऊन कॉलेज साठी बक्षीस आणू लागलो.. फक्त बी.ए. शाखेतच नाही तर संपूर्ण कॉलेजमध्ये विश्वास हे नाव आता ओळखीचं झालं होतं ..भरीस भर म्हणजे माझ्यासोबत प्रत्येक स्पर्धेला ती स्वतः भाग घेऊ लागली