“तरुण, बॅंगलोर ऑफीस कन्व्हेड स्पेशल थॅक्स टु युअर व्हिजीट, इट हेल्प्ड देम अ लॉट..”, मुरली दुसर्या दिवशी मला ऑफीस मध्ये म्हणत होता.. “दे वेअर जस्ट चेकींग इफ़ यु वुड लाईक टु रिलोकेट टु बॅंगलोर?” “रिलोकेट? यु मीन परमनंटली? ऑर टेंम्पररी?”“लेट्स सी.. स्टार्ट विथ अ इअर फ़स्ट अॅन्ड इफ़ यु लाईक, यु कॅन टेक अ कॉल.. आय एम गुड विथ इट.. यु डिसाईड..” कल्पना खरं तर चांगली होती.. सगळ्यांपासुन काही काळासाठी दुर गेलो तर कदाचीत हे सगळं विसरायला होईल असं काहीसं वाटत होतं, पण त्याचबरोबर प्रितीपासुन इतक्या दुर जायचं मनाला पटत नव्हतं. म्हणजे.. जस्ट दोन दिवसांपुर्वीच तर आम्ही ब्रेक-अप केलं होतं..