ये ग गौराबाई भाग १ गणपतीचे आगमन झाले की पाठोपाठ होते गौरीचे आगमन गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी व नंतर शंकरोबांचे आगमन होते.अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया गौरीपूजनाचे व्रत करतात. गौरीचा सण महिलांचा विशेषतः माहेरवासिनींचा अमाप उत्साहाचा सण असतो .जुन्या आठवणी उजळून निघणारे माहेरपण भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणावा लागेल. महिलावर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येतो.गौरी याचा अर्थ एक अनाघ्रात मुलगी ,गौरी म्हणजे पृथ्वी ,तरुण पत्नी ,तुळशीचे झाड जाईचा वेल असेही अर्थ आहेत.ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी सोबत तेरड्याचीही गौरी म्हणून पूजा केली जाते .भाद्रपद महिन्यातील या सणा दिवशी प्रत्येकाच्या कुलाचारा नुसार गौरीचे पुजन केल जाते .हिलाच महालक्ष्मी म्हणतात .ज्येष्ठ नक्षत्रावर पुजाहोत असल्याने ती