**************** हास्येश्वरास पत्र ! ************प्रति,हास्येश्वरा,तुला मनापासून हसऱ्या चेहऱ्याने स.न. वि. वि.आम्हा मानवाच्या जीवनात तुझे स्थान जणू आत्म्यासारखे! नव्हे तू आमचा आत्माच आहेस. जिथे तू नाहीस तिथे राम नाही, त्या वातावरणात जिवंतपणा नाही. अगदी आमचा जन्म झाल्यापासून ते थेट आम्ही चितेवर जाईपर्यंत तू आमची साथ करतोस.... इमानदारीने... प्रामाणिकपणे! अगदी बाळ जन्माला आले की, पहावयास येणारे बाळाला पाहताच म्हणतात, 'व्वा! हसरा चेहरा आहे. जीवनात आनंदी असेल हो.'त्याचप्रमाणे मृत्यूनंतर अंत्यदर्शनासाठी येणारे कुणीतरी म्हणते, 'आनंदी जीवन जगले हो. आताही चेहऱ्यावर समाधान, हसरी छटा आहे.'असा आहे हास्यसम्राटा तुझा महिमा. आमच्या शरीराच्या प्रत्येक अणूमध्ये तुझे वास्तव्य आहे. डोळे असोत, ओठ असोत, चेहरा असो