प्यार मे.. कधी कधी (भाग-१३)

(14)
  • 13.7k
  • 6.9k

थोड्या वेळानंतर पुन्हा एक मेसेज आणि नंतर पुन्हा एकामागोमाग एक.तरुणला कुठलाही मेसेज वाचायची किंवा रिप्लाय करायची इच्छा नव्हती. तो डोळे बंद करुन पडुन राहीला, उशीरा कधी तरी त्याला झोप लागली. सकाळी फोनच्या आवाजाने मला जाग आली, घड्याळात ६.३०च वाजत होते. चडफडत फोन उचलला.. प्रितीचा होता. “हॅल्लो…”“अरे काय? कुठे आहेस? काल किती मेसेज केले.. एकाचा पण रिप्लाय नाही?”“हम्म.. अगं जरा डोकं दुखत होतं, त्यामुळे लवकर झोपलो..”“ओह.. मग आता बरं आहे का?”“हम्म ठिक आहे आत्ता. तु काय सकाळी सकाळी?”“अरे जॉगींगला आले होते बाहेर.. सॉरी.. झोप मोड केली का?”“नाही, तसं काही नाही…” काही वेळ शांततेत गेला. “तरुण, सगळं ठिक आहे ना?”“हम्म.. ”“पण तुझ्या