ना कळले कधी Season 2 - Part 14

(16)
  • 11.1k
  • 6.9k

बर झाल थांबला किती मोठी काळजी मिटली माझी. ती त्याला म्हणाली. आर्या तुझ आपलं काहीतरीच असत रात्री जाऊ नको म्हणे काय झालं गेलो असतो तर उगाच आपल काहीतरी.मी आईला काय सांगितलं असत का गेला सिद्धांत?आणि सकाळी उठून परत जायचंच आहे ना! अरे उद्या असही ऑफिस नाही आहे मग आता जायच काय किंवा उद्या सकाळी काय फरक पडतो. आणि इथे झोपायचं काय तिथे झोपायचं काय सारखच आहे. काही सारख नाही ती माझी रूम आहे ही तुझी आहे किती मोठा फरक आहे हा. अरे एक रात्र काढायची आहे तुला इथे फक्त मी काही settle होअस नाही म्हणत आहे.