तू माझा सांगाती...! - 10

  • 7.7k
  • 2.8k

"काय झालं बाबा? तुम्ही इतके अस्वस्थ का आहात?" विक्टरने चिंतेने विचारले."क... काही नाही..." जनार्दन सारंग यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला."तुम्ही खोटं बोलताय हे मला समजतंय. खरं सांगा काय झालंय?" विक्टरने जनार्दन सारंग यांना सांगण्यासाठी फोर्स केलं.तसं जनार्दन सारंग यांनी विक्टरकडे पाहिलं. खूप वेळ अडवून ठेवला बांध फोडून त्यांच्या डोळ्यांतून आसवं ढळू लागली...हे पाहून विक्टर पुढं झाला आणि बाजूला बसत त्याने जनार्दन सारंग यांना सावरण्याचा प्रयत्न केला."बाबा... शांत व्हा..." तो म्हणाला.पण काही केल्या जनार्दन सारंग यांच्यातील शोक शांत होत नव्हता. विक्टरने मग त्यांना शांत करण्याचा अट्टहास सोडून मनसोक्त त्यांना रडू दिलं.थोड्यावेळाने जनार्दन सारंग यांचे रडणे तर बंद झाले, पण कसला तरी