प्रीतीची 'प्रेम'कथा - 2

  • 8k
  • 3.8k

2 सुरूवातीची सुरूवात! अर्थात प्रथम तुज पाहता अनंतराव घोरपडे म्हणजे तात्या.. म्हणजे वडील माझे. अनंतराव घोरपडे. रंगढंग प्रकाशनात तात्या सीनियर मॅनेजर आहेत. तात्यांचा मनुष्य संग्रह दांडगा. मनुष्य संग्रह हा शब्द तात्यांचाच! मला गंमत वाटते त्या शब्दाची. प्राणी संग्रहासारखा मनुष्य संग्रह! म्हणजे तात्या आॅफिसात न जाता कुठल्यातरी अशा जागेत जातात जिथे पिंजरेच पिंजरे आहेत.. नि एकेकात एकेक मनुष्यास ठेवण्यात आले आहे.. दोरीस बांधून! आई माझी घर चालवते. तात्यांचा संबंध पुस्तकांशी आहे तसा तिचा नाही. रोजचा पेपर एवढेच तिचे वाचन. आणि मी! पुस्तकांच्या पसाऱ्यात राहूनही चिखलातल्या कमळासारखी अलिप्त मी! अगदी बीए झाली मी पण वाचनाची काही आवड नाही मला. आमचे स्वामी