जुळले प्रेमाचे नाते - भाग-३

(54)
  • 24.5k
  • 1
  • 17.4k

सकाळच्या अलार्म ने माझी झोपमोड झाली. घडाळ्यात सात वाजता होते. मी आज स्वतःच उठले, आज पहिला दिवस होता ना माझा आणि निशांत चा. म्हणजे डान्ससाठीचा... डान्स बसवायचा होता त्यामुळे लवकर तय्यारी करून मला निघायचं होत. मी फ्रेश होत बाहेर आले. किचनमध्ये आई डब्बा तय्यार करत होती. "आई.., मला लवकर चहा आणि नाश्ता दे मला उशिर होतोय." काय मॅडम.! आज लवकर उठलीस, ते ही मी न उठवता...!! .... सूर्य कोणत्या बाजुला उगवला आहे...... आईने डोळा मारतच मला विचारलं.... आई..! काय ग...चल दे लवकर नाश्ता उशीर होतोय.... माझ्या हातात चहा आणि नाश्ता देत आई उच्चारली. "बाळा निशांत चांगला मुलगा आहे हा. आवडला