तू माझा सांगाती...! - 9

  • 8k
  • 2.8k

"पण त्यात गैर काय आहे? तुम्हीही एप्लाय करा ना नॅशनल हेरिटेज अँड प्रिजरवेशन ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजे आपल्याला कायम एकत्र राहता येईल."विक्टरच्या या बोलण्यावर मात्र जनार्दन सारंग हसले. म्हणाले,"अरे रे तर आपण असूच. पण त्यासाठी अमर व्हावं, असं मला वाटत नाही. हे आयुष्य एकदाच मिळतं आणि ही तर जीवनाची ब्युटी आहे. जर अमर झालो, तर जगण्यातली सूंदरताही आपण गमावून बसू. नाही का? जीवनातील उत्साह निघून जाईल...! आपल्याला मरण नाही हे लक्षात आल्यावर कुणी सांगावं, लोक कर्म करणं सुद्धा सोडू शकतात!" जनार्दन सारंग स्मित मुखावर आणत बोलले,"आणि म्हणून मला माझ्या जगण्यातील एडवेन्चर मरू द्यायचं नाही! भले मी मेलो, तरी चालेल! हेच आयुष्य तृप्तीने