निशब्द - भाग 2

  • 12.8k
  • 7.9k

जवळपास सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला होता मी परीक्षेच्या आधीच काम सोडल आणि जोमाने अभ्यासाला लागलो .. जसजसे परीक्षेचे दिवस जवळ येत होते तसतशी भीती अधिकच जाणवत होती ..शेवटी परीक्षा येऊन ठेपली ..सकाळी साडेनऊ चा पेपर होता.. ती नेहमीसारखीच अगदी वेळेवर आली होती .. मी तिला विश करायला जावं आणि तिला विश करणाऱ्यांची गर्दी जमली ..मी शेवटी नाखूष होऊन एका कोपऱ्यात उभा राहिलो ..गर्दी हटली पण माझी तिच्याकडे जाण्याची हिम्मत झाली नाही पण तिला कदाचित ते कळलं असावं आणि तिने स्वतः येऊन मला विश केल...त्यामुळे मी देखील तिला विश केलं .. ती गेली तेव्हा आनंद गगनात मावेना ..आता