प्यार मे.. कधी कधी (भाग-११)

(15)
  • 14.8k
  • 2
  • 8.1k

“वन्नक्कम थरुन..” आमच्या टीमचा बॅंगलोरचा लिड, स्वामी, मला वेलकम करत होता“अं.. स्वामी, इट्स तरुण, नॉट थरुन..”“येस्स येस्स.. थरुण..प्लिज कम.. प्लिज कम..” ह्या लोकांना ‘त’ शब्दाचा उच्चार जमतच नाही बहुतेक, ‘नितीन’ चं ‘निथीन’, ‘रोहीत’चं ‘रोहीथ’ करतात तसं माझं ‘थरुन’ करुन टाकलं होतं. मी लगेचच त्याला करेक्ट करण्याचा नाद सोडुन दिला. पुढचा बराच वेळ फ्रेशर्सशी इंट्रो, जुन्या प्रोजेक्ट्सवरील कलीग्ज, स्किप-लेव्हल मॅनेजर्स ह्यांच्याशी मिटींग्जमध्येच गेले. सकाळी प्रितीशी बोलण्याच्या नादात फ्लाईटमध्येही काही खाल्ले नव्हते, त्यामुळे भयंकर भुक लागली होती. मग १२.३०लाच लंचब्रेक घेतला. कंपनीचा कॅफेटेरीया सॉल्लीड होता, जणु काही एखादा लाऊंजच. फुट-थंपींग गाणी चालु होती, गेम-एरीया ओसंडुन वाहात होता. वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या प्रकारचे सेक्शन्स