तू माझा सांगाती...! - 8

  • 7k
  • 1
  • 2.5k

विक्टर बद्दल त्या थ्री-डी होलोग्राम मधील व्यक्तीला जनार्दन सारंग यांनी माहिती दिली. विक्टरला स्माईल देऊन ती व्यक्ती बोलू लागली ती नाराजीतच..."साल्या जण्या, माझ्या अंत्यसंस्कारासाठी नाही ते नाही माझ्या मातीला पण आला नाहीस होय?" ती व्यक्ती नाराजीने बोलली."मरून पण जिवंत आहेसच की लेका. मग शोक कशाचा करणार होतो?" त्या व्यक्तीची चेष्टा करण्यासाठी जनार्दन सारंग म्हणाले,"आणि काय तो तुझा वाढदिवस होता होय, की मी आवर्जून यायलाच हवं होतं? बरं ते जाऊ दे; मला आधी हे सांग, की मी तेथे नव्हतो, हे तुला सांगितलं कोणी?""नलिनीने!" होलोग्राम मधील व्यक्तीने खुलासा केला."वाटलंच! तुझ्या बायकोला सवयच आहे भांडणं लावायची!" जनार्दन सारंग त्या व्यक्तीला चिडवण्यासाठी बोलले."च्यायला हे