जुळले प्रेमाचे नाते - भाग-२

(39)
  • 23.4k
  • 2
  • 19.5k

मी हसुन परत बोलु लागली......, मी एकदा कॉलेजला जायला निघाले. भरपूर पाऊस होता, पण कॉलेजला जाणे गरजेचे होते. लेक्चर्स मिस करन महागात पडल असत. मी ट्रेन ने स्टेशनला पोहोचले, तिथून ऑटो करेन म्हणुन थांबले होते की, एक ऑटो माझ्या समोर येऊन थांबली. मी पाहिलं तर आत निशांत होता. मला यायला सांगत होता तो. आधी मी नाही बोलले, पण एवढ्या पावसात परत ऑटोसाठी थांबन मूर्खपणाचे ठरले असते. मग काय बसले जाऊन त्याच्या सोबत. बाहेर पाऊस, आणि त्या ऑटोमध्ये मी आणि तो. छान वातावरण होत बाहेर. अचानक माझी नजर त्याच्यावर गेली. त्याचे ते फिजलेले केस डोळ्यावर येत होते, तो सारखे कंटाळून ते