प्रितीने पाठवलेले फोटो मी आपले सहजच नजरेखालुन घातले. मला तसंही त्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. माझं लक्ष वेधुन घेतलं ते प्रितीच्या व्हॉट्स-अॅपच्या डि.पी.ने. बहुतेक घरातच काढलेला सेल्फी होता. साधा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची स्लॅक, मान काहीशी तिरपी करुन एका हाताने केस कानांच्या मागे करतानाचा तो फोटो होता. त्या साध्या फोटोतही कसली क्युट दिसत होती. मी खूप वेळ त्या फोटोकडेच बघत बसलो. मी प्रितीचे स्टेटस चेक केले, ती अजुनही ‘ऑनलाईनच’ होती. आय वॉन्टेड टु से समथींग..पण काय? काही शब्दच सुचत नव्हते. पाच-एक मिनीटं शांततेत गेली. “यु ऑलराईट?”, अचानक प्रितीचा मेसेज स्क्रिनवर झळकला..“हम्म.. मी ठिक आहे..”“अॅक्च्युअली.. मी पाठवणार होते तुला फोटो आधी, पण