नवरंगी नवरात्र - भाग २

  • 7.5k
  • 3k

दुर्गानवमी आश्विन शुद्ध नवमी म्हणजे दुर्गानवमी किंवा महानवमी म्हणतात. शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात. या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, घारगे, वडे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या अंती घारग्यांचे वाण सवाष्णींना दिले जाते . रात्रौ जागरण व देवीच्या कथांचे श्रवण करतात. दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करतात. दुर्गामाता ही या व्रताची देवता आहे. प्रत्येक मासात भिन्न उपचारांनी देवीची पूजा करणे व उद्यापनाचे वेळी कुमारिकांना भोजन घालणे हा या व्रताचा विधी आहे.या काळात नऊ प्रकारच्या