तू माझा सांगाती...! - 5

  • 7.5k
  • 1
  • 3k

माणूस मेल्यानंतर त्याची मेमरी प्रिजर्व करून ठेवली, तर आपण अमर होऊ हा त्यामागील विचार होता. नंतर व्हर्च्युअल रिएलिटी व होलोग्रामच्या माध्यमातून ती व्यक्ती पुन्हा रिक्रिएट करता येते. किंवा मग ती मेमरी एखाद्या रोबोट मध्ये इन्सर्ट करून त्या माणसाला रिवाईव्ह केले जाते. २१ व्या शतकातच क्लोनिंगवर बंदी घातली आहे. ती अजूनही तशीच आहे. त्यामुळे अमर होण्यासाठी हा पर्याय लोकांनी शोधून काढला होता. पण या मार्गातून अनेक कुख्यात गुन्हेगार सुद्धा मेल्यानंतर पुन्हा जिवंत होऊन आपापली कुकर्मे चालू ठेवत आहेत हे समोर आल्यावर मग जगभरातील सर्व सरकारनी यावर आपला अंकुश आणला होता. सर्व देशांनी यूनाईटेड नेशन्सच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात आपापल्या देशांत नवीन विभाग तयार करून