मी आहे... तुमची लाडकी

  • 11.5k
  • 1
  • 3.5k

मी आहे....... तुमची लाडकी!मा. वाचक,खंदे पुरस्कर्ते आणिकट्टर विरोधक, सर्वांना नमस्कार. लोकशाहीच्या या अत्यंत पवित्र, मंगलमय महोत्सवात मी आपले मनापासून स्वागत करते. त्याचबरोबरीने असेही आवाहन करते की, या लवकर या. सर्वांनी माझ्याशी हस्तांदोलन करा. मी तुमच्याशी हस्तांदोलन करायला उतावीळ झाले आहे. तुम्हाला बघितले की, भेटले की, मला या जगातील सर्वात प्रिय अशा व्यक्तीला भेटल्याची जाणीव होते. माझे तुमच्यावर अतिशय पवित्र असे प्रेम आहे. नाही ओळखले? माझा वीट, कंटाळा तर आला नाही ना? मला ओळखले नसणार कारण कुणी कितीही बोटे मोडो, नाक मुरुडो, कपाळावर आठ्या पाडो, इतकेच काय माझ्या नावाने शिमगा करो पण मी माझे पवित्र