प्रलय - २२

  • 6.9k
  • 3.2k

प्रलय-२२ महाराज विश्वकर्मा जलधि राज्याकडून जी पाच हजारांची सैन्य तुकडी घेऊन आले होते त्या तुकडीच्या तळावरती स्मशान शांतता पसरली होती . काही वेळापूर्वी एक जळता तीर येऊन जमिनीत घुसला . त्याच्यावरती असलेल्या संदेशपत्रांमध्ये एक मजकूर लिहिला होता . " गपचूप , जिथून आला तिकडे माघारी जा , अन्यथा तुमच्या महाराज विश्वकर्मासहीत इतर सातही जणांच्या बलिदानासाठी तयार राहा..... "विक्रमाने रितिरिवाज व परंपरा बाजूला सारत बोलण्यासाठी , संधी करण्यासाठी आलेल्यांवरती पाठीमागून वार केला होता . त्याच्यांबरोबर आलेले सैनिक मारून टाकत उरलेल्यांना कैद करून आणलं होतं . ज्या लोकांना त्याने कैद केलं होतं ते सामान्य सैनिक