तू माझा सांगाती...! - 4

  • 7.4k
  • 2.8k

तशात काही विरोधी राजकारणांनी स्वयें यात उडी घेतली. कोणाच्याही आमंत्रणाशिवाय! आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याच्या नादात लोकांच्या मनातील रोष अधिकच भडकवण्याचे काम हे तथाकथित ज्ञानी व समाज हितदक्ष लोक करू लागले. फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली हे वाट्टेल ती वाच्यता लागले. ज्यातलं आपल्याला काही कळत नाही असेही काही म्हणण्यापेक्षा बरेच लोक यात सामील झाले होते...शांतता प्रिय सामाजिक विचारवंतांनी याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही द्रोही ठरवून बेदम मारण्यात आलं...कायद्यात मॉबने मिळून काही गुन्हा केला आणि त्यात कोणी मारले गेले, तर त्या बद्दल काहीच शिक्षेची तरतूद नव्हती. त्यामुळे या लोकांना कायद्याअंतर्गत अडवणं शक्य नव्हतं. रोबोट्स बिचारे मार तर खात होते, पण