"मल्हारगड-(सासवड-पुणे)" घरच्या जबाबदाऱ्या...आमच्या पिल्लासांठी दिलेला वेळ... यात आम्हाला आमच्यासाठी वेळच देता आलं नाही...शेवटी प्रसाद च्या पुणे ट्रान्सफर चे निम्मित झाले आणि मग ठरले पुण्याला ट्रेकक करू...शेवटचा ट्रेकक जानेवारी १७ ला केला होता आणि आता फेब्रुवारी १८ ला ट्रेकक करत होतो...वर्षभराच्या काळात पोटावर टायर पण जमा झाले होते...म्हूणन त्यातला त्यात सर्वात सोपा किल्ला निवडला "मल्हारगड-(सासवड-पुणे)" ह्या किल्ल्याला सोनेरीचा किल्ला पण बोलतात...का ते फोटो बघून समजेल... आम्ही पाच जण तयार झालो भिवाजी,रघुनाथ,अमित, प्रसाद फ्रॉम पुणे आणि मी आमची सुरवात झाली रेल्वेची तिकीट बुक करण्यापासून... शनिवारी रात्री ११ ची ठाणे स्टेशन वरून पुणे ला जाणारी रेल्वे पकडली ( कोईम्बतुर एक्सप्रेस)...ती पोचली तिथं बरोबर