प्यार मे.. कधी कधी (भाग-४)

(16)
  • 23.8k
  • 4
  • 13.9k

“डू आय बिलीव्ह इन लव्ह अ‍ॅट फ़र्स्ट साईट?”, ऑफीसला जात असताना डोक्यात एक विचार चमकुन गेला…“फ़र्गेट फ़र्स्ट साईट, डू आय बिलीव्ह इन लव्ह?” “व्हॉट इज लव्ह?”“मनांशी मन जुळणं?, की जस्ट अ फिजीकल अ‍ॅट्रॅक्शन? का दोन्ही? का अजुन काही तिसरं पण असतं?”“असणारंच.. कारण दोन भेटींमध्ये प्रितीबद्दल जे काही मला वाटत होतं ते ह्या दोन्हींपैकी कुठल्याही मुद्यावरुन नव्हतं. तिच्याबद्दलच्या भावना ह्या मनाच्या खूप आतून आल्या होत्या.. आणि खुपच स्ट्रॉग होत्या.. जसं काही मला तिच्याबद्दल जे वाटत होतं त्याबद्दल कुठलंही दुमत नव्हतंच..” सोमवारची सकाळ ही बहुतांश आय.टी. वाल्यांची अजातशत्रु असते, आणि तो आय.टी. इंजीनीअर माझ्यासारखा.. नुकताच प्रेमात पडलेला असेल तर ती सकाळ अगदी