प्यार मे.. कधी कधी (भाग-३)

(19)
  • 24.8k
  • 20.3k

मला फक्त आणि फक्त तिच दिसत होती. अगदी आपण इंन्स्टाग्राम मध्ये बाकीच्या गोष्टी धुसर करुन टाकतो एखाद्या गोष्टीवर फोकस रहाण्यासाठी.. अगदी तस्संच. मी कुठे होतो? माहीत नाही! ती कुठे होती??.. काय फरक पडतो.. ती ‘होती’, ह्यातच सर्वकाही होतं. तिच्या हसण्याचा आवाज, तिचे स्पार्कलिंग डोळे, क्षणाक्षणाला तिच्या चेहर्‍यावर येत असुनही मनाला गुदगुल्या करणारे तिचे केस सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होतं. तिने एकदा तरी माझ्याकडे बघावं ह्यासाठी मन आक्रंदत होतं. पण तिचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. काय करू म्हणजे ती एकदा तरी माझ्याकडे बघेल? काय करु म्हणजे माझं अस्तीत्व तिला जाणवेल? मला तिच्या समोर जायचं होतं, पण सिमेंटमध्ये रोवल्यासारखे पाय जमीनीमध्ये घट्ट