रातराणी.... (भाग १३)

  • 6.6k
  • 2
  • 3.5k

तसा विनय हसू लागला. " काही नाही तसं ... छान वाटते तिच्याशी बोलताना... थंड हवेची झुळूक वाटते ती.. आणि तिची smile बघितली नाही... काय फील होते .. ते नाही explain करू शकत. " विनय वेगळ्याच जगात गेलेला बोलताना. " तसं काही नाही माहित आहे. पण दिक्षा आणि तुझ्यात .. नक्की काही सुरु आहे... तसा तू आता पूर्ण ऑफिसचा हिरो झाला आहेस.. सर्व मुली तुझ्यावर फिदा असतात.. तुझ्यामुळेच , हे सर्व सुरु झालं हे सुद्धा मान्य... तरी .... दिक्षा तुला like करते आणि तुलाही ती आवडते .. हे मला कळते... छान सुरु आहे ... असच राहू दे... " म्हणत चंदन निघून गेला.