विनयने त्याची गाडी वळवली ती हॉस्पिटलच्या दिशेने. काही "काम" होते त्याचे. काही रिपोर्ट्स घेऊन निघाला तसे त्याला एक ओळखीचे डॉक्टर भेटले. त्यांच्याशी गप्पा मारत उभा राहिला. अचानक, भांडणाचा आवाज येऊ लागला. " आलोच " विनयने त्या डॉक्टरांचा निरोप घेतला आणि आवाजाच्या दिशेने गेला. बघतो तर हेमंत भांडत होता. " अक्कल आहे का जरा तरी ... तिथे माझ्या भावाला धड उभं राहता येत नाही. आणि तुम्ही बोलता , रांगेत उभे रहा. " हेमंत चढ्या आवाजात बोलत होता. " हो सर.... तरी सुद्धा तुमच्या पेशंट साठी बेड availble नाही करू शकत इतक्या जलद.... " , " इतके मोठे हॉस्पिटल आहे... आणि एकही बेड नाही...