रुद्रा ! - ७

  • 7.1k
  • 2
  • 4.7k

मनोहरने हात डोक्याच्यावर ताणून मोठा आळस दिला. आपला हरामखोर बाप कुबेर आहे आणि त्याचा काटा परस्पर काढायचाय हे त्याने जेव्हा नक्की केले,तेव्हा त्याचा घरातील बित्तंबातमी हाती असणे आणि ती पुरवणारी व्यक्ती हुडकणे गरजेचे होते. जसवंत शिवाय इतर कोणीच हे काम करू शकणार नव्हते. जसवंताताचा इतिहास शोधताना, मनोहरला ते हुकमी शस्त्र घावले! जसवंतला गांजाचे जबरदस्त व्यसन होते! मनोहरने अर्थात त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला!"जसवंत, मी तुला गांजाच्या पुड्या देत जाईल, त्या बदल्यात तू मला संतुकरावची माहिती दे!" मनोहरने एक दिवस जसवंत समोर सरळ प्रस्ताव मांडला. विना पैशाच्या 'माल' मिळतोय! अशी संधी जसवंत सोडणार नव्हता!"काय माहिती? अन कशाला?" जसवंतने सावध पैंतरा घेतला. "तुला काय करायचंय?""तुला काही