बालचारित्र्य कथाएक आहे अनिकेतसंजय वि. येरणेभरारी प्रकाशन, नागभीड. मनातलं शिक्षणाची संकल्पना बदलली, आनंददायी शिक्षणातून गंमत जंमत खेळागत शिक्षणाची धुरा सुधारण्यात आली. मी प्राथमिक शिक्षक मनानेच झालो. लहान असतांना वाटायचं, सर, आपल्याला शिकवतात म्हणजे ते किती हुशार असतात बरे ! त्यांना खूप ज्ञान असेल नाही का? हया बालपनातल्या न उमजलेल्या गोष्टीनेच शिक्षकी सेवेचं व्रत स्वीकारायचं ठरलं. पण सुरवातीला जो उत्साह, उमेद या सेवेत होती तो उत्साह पुढे टिकला नाही. शिक्षण सेवा न राहता व्यवसायाचं स्वरूप बनले. राजकीय शासकीय प्रणालीने शिक्षणाचा विकास करतांना त्यात भरपूर सुधारणा घडवल्या. पण कार्यकुशलता नसणे, स्वार्थ, हेवेदावे हयातून गंभीर बाबी दिसू लागल्या. प्रशासनही हयाला जबाबदार धरावं काय?