रात्रीचे अकरा वाजून गेले होते. रहदारीच्या रस्त्यापासून दोन एक किलोमीटर तो एकाकी 'नक्षत्र' नावाचा टुमदार दोनमजली बांगला ऐटीत उभा होता. हमरस्त्यावरून 'नक्षत्र 'कडे जाणाऱ्या वाटेवर दुतर्फा दाट झाडी होती. त्या झाडांच्या पसाऱ्यात लाईटचे खांब हरवल्या सारखे उभे होते. त्यांच्या प्रकाशाला पानांच्या फटीतून मार्ग हुडकावा लागत होता. डार्क ब्लु जीन आणि काळा शर्ट घातलेल्या रुद्राने आपली मोटरसायकल एका झाडाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात स्टँडला लावली. सव्वा सहा फूट उंचीचा रुद्रा, कपड्याच्या रंगामुळे त्या अंधाऱ्या वातावरणातली एक छाया होऊन गेला होता. त्याने काही दिवसान पूर्वी या परिसराची कुरियर वाला बनून रेकी करून ठेवली होती. सेक्युरिटी म्हणून एकच दणकट बाउन्सर वाटावा असा गार्ड मेन गेट जवळच्या केबिन मध्ये