आजी,आजोबा म्हणजे वयो वृद्ध,ज्यांनी आयुष्यात अनेक पावसाळे पाहिले,खस्ता खालल्या.सुख दुःखाचे प्रसंग पाहिले.त्यांच्या पाठीशी मोठा अनुभव आहे.त्यांच्या कडून समाजाला मार्गदर्शन व्हाव.,त्यांच्या अनुभवाचा फायदा पुढच्या पिढीला व्हावा ,व्हायलापाहिजे असं काहींना वाटत.तसाच आजी आजोबांना पण वाटत. त्यांच्या काळात एकत्रकुटुंब पद्धत होती.एकत्र कुटुंब पद्धतीत,विचारातभिन्नता असते तरी सुद्धा एकमेकाला समजूनघेत असत.काळा नुरूप नंतरची पिढी शिकलीआणि साहजिकच नोकरी निमित्त म्हणा अथवाव्यवसाया निमित्त बाहेर पडली. या नवीन पिढीच्या प्रगती करिता,आईवडिलांनी कधी विरोध केला नाही,त्यांच्या उत्कर्षाला प्रोत्साहन दिले.इतकेच नव्हे प्रसंगीआर्थिक मदत केली. असं असून सुद्धा ,ज्या वायातत्यांना , आपुलकीची,प्रेमाची,जिव्हाळ्याची जरूर असते ती