चैत्र पाडवा

  • 12.2k
  • 2.1k

भारतीय संस्कृती उत्साहाने आणि चैतन्याने रसरसलेली आहे. या संस्कृतीचे एक अविभाज्य अंग म्हणजे उत्सवप्रियता. या उत्सवाच्या आनंदाची सुरुवात होते चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून. हा दिवस गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो. ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला सर्व सृष्टी निर्माण केली असे आपली परंपरा मानते. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे.