तोच समुद्र किनारा..... तोच निळाशार पसरलेला अथांग सागर... पायाखाली असंख्य शंख -शिंपले.... आणि .... आणि रातराणीचा सुगंध.... तेच स्वप्न... विनयला जाग आली कसल्याश्या आवाजाने.. हळूच डोळे उघडले त्याने. बाजूला चंदन होताच, " बाहेर पाऊस पडतो आहे का रे.. " " नाही ...आता कसा पाऊस.. हिवाळा सुरु आहे... पावसाळा संपून २ महिने झाले... झोप तू... तूला भास झाला असेल.. " ," नाही रे... अजूनही आवाज येतो आहे पावसाचा मला... माझ्या कानात घुमतो आहे आवाज त्याचा... सरींचा... पागोळ्यांचा... पानावर पडणाऱ्या थेंबांचा... " चंदनला गहिवरून आलं. " झोप शांत... नको करुस विचार... " विनय तसाच उघड्या डोळ्यांनी छताकडे बघत होता. चंदन बघत होता त्याच्याकडेच. कसा होता