भयानक स्वप्न !

  • 16k
  • 7.6k

रात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली? लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी.पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज. कोणी तरी बाहेरून दाराच्या ल्याचशी झटपट करतोय! चोर! मी अजून थोडा वेळ तसाच पडून राहिलो. आता माझे डोळे अंधाराला सरावले होते. पणआमच्या या मास्टर बेडरूम मध्ये अंधार कसा? अंधारात उषाला झोप येत नाही. ती नेहमी बेडलॅम्प लावून झोपते. मी शेजारी नजर टाकली. तेथे उषा नव्हती. माझ्या पोटात धस्स झाले. बहुदा बाथरूम मध्ये गेली