एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-२]

(12)
  • 38.2k
  • 1
  • 13.6k

“अरे खरंच जा रोहनं, मी आत आईबरोबर पापड करत बसणार तु तसाही कंटाळशील. त्यापेक्षा जा ना तिच्याबरोबर. आणि ती काय तुला नविन आहे का? कॉलेजपासुनची आहेच की ओळख”, शरयु. राधीका आपल्या भुवया थोड्याश्या उंचावुन म्हणाली, “बघं गं, मला काही प्रॉब्लेम नाही, पण नंतर तुच म्हणशील माझा नवरा पळवला म्हणुन!!” आणि दोघीही हसायला लागल्या.रोहनने लगेच आपले कपडे बदलले. राधीकाबरोबर सिनेमाला जायचे यात एकदम थ्रिल्ल होते, पण त्याच बरोबर शरयुला एकटीला सोडुन जायला ही नको वाटत होते. शेवटी काय हरकत आहे. तसेही शरयु म्हणत आहे म्हणुनच जात आहे ना, लपुन-छपुन तर जात नाहीये. उगाच त्यांचे पापड-लाटणे बघण्यापेक्षा सिनेमा बघीतलेला बरा.. असं मनाला