गणपती बाप्पा मोरया - भाग ६

  • 9.1k
  • 3.1k

यानंतर कौंडीण्य परतल्यावर सुशीला आणि कौंडीण्य परत रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान एक मोठे नगर लागले. हे कोणते नगर? हे कोणाचे नगर आहे? त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. "स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात! या नगराचे ,राज्य तुमचेच आहे." असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभवसंपन्न राजप्रसादात नेले. अनंतपूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते हे सुशिलेच्या लक्षात आले . एके दिवशी कौंडीण्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले, "हे हातावर तू काय बांधले आहेस?" सुशीला म्हणाली, "हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत