धुक्यातलं चांदणं ....... भाग १६

(46)
  • 9.8k
  • 5.2k

रात्री पूजाने माथेरानची माहिती search केली, इंटरनेट वर. चार अनाथाश्रम होती तिथे. चारही ठिकाणाचे नाव आणि पत्ते लिहून घेतले तिने. सकाळीच निघाली पूजा. मजल-दरमजल करत पूजा पोहोचली माथेरानला. तेव्हा सकाळचे १० वाजले होते. माथेरानला उतरली आणि थंड हवा आली. अजूनही रस्त्यावर धुकं होतं. आभाळ भरलेलं,सोबत वाराही होता. कुंद वातावरण,मनाला हवंहवंसं वाटणारं. पूजा हरखून गेली. पहिल्यांदा आली होती ती इथे. विवेकचा विचार आला आणि ती भानावर आली. पहिला पत्ता काढला आणि विचारत विचारत ती पोहोचली तिथे. विवेकचा फोटो घेतला होता तिने मोबाईल मध्ये. त्या अनाथाश्रमात गेल्या गेल्या तिने, तिथे काम करणाऱ्या एका माणसाला विचारलं,"याला पाहिलं आहे का तुम्ही इथे?", त्याने निरखून पाहिलं."विवेकसाहेब