धुक्यातलं चांदणं ....... भाग १४

  • 7.7k
  • 5.4k

विवेक पूजाच्या बँक बाहेर येऊन उभा राहिला. १० मिनिटांनी पूजा आली आणि त्याला बघून जागच्या जागी थांबली. विवेकने पुढे येऊन पूजाचा हात धरला आणि ओढत ओढत तिला पुढे घेऊन आला. " हात सोड विवेक… " पूजा ओरडली त्याला. हात झटकला तिने." काय झालंय पूजा. का अशी वागतेस ?","काही नाही." म्हणत ती जाऊ लागली. तसा विवेकने तिचा रस्ता अडवला. "नाही. काहीतरी आहे नक्की." पूजाने काही उत्तर नाही दिलं. " बोल ना काहीतरी.","काय बोलू ?","फोन का उचलत नाहीस?","तुला माहित आहे, काम खूप असते.","ठीक आहे. ऑफिस सुटल्यावर भेटत का नाहीस?", पूजा शांत."बोल !!","तुला काय सगळं सांगायला पाहिजे का आणि माझ्या वडिलांना आवडत नाही, कोणाला भेटलेलं." विवेकला