ना कळले कधी Season 1 - Part 33

(17)
  • 11.8k
  • 1
  • 8.4k

दोघेही जण बसले होते कोणीही काहीही बोलले नाही. आर्याने आपला मोबाईल काढून त्यामध्ये निसर्गाचे सुंदर सुंदर फोटो काढायला सुरवात केली. सिद्धांत तिच्या जवळ आला आणि म्हणाला 'आर्या, तुझा फोन बघू.' 'का काय झालं?', तिने विचारलं. अग काही नाही मला फक्त तुझी 'फोटोग्राफी बघायची आहे.', तिने फोन त्याच्या हातात दिला. 'काय बघणार आहे कुणास ठाऊक? फोटोग्राफी मधलं काय कळत असणार ह्याला, हा तर पुस्तकी किडा आहे.', त्याने एक दोन photos तिला दाखवले, 'हे बघ आर्या, हे सुंदरच आहेत पण आणखीन सुंदर कशे आले असते हे मी तुला सांगतो.', आणि त्याने तिला काढून दाखवले. 'wow sir, its really amazing!!!!! काय सुंदर फोटोग्राफी