गणपती बाप्पा मोरया - भाग-१

  • 38.4k
  • 18.4k

गणपती बाप्पा मोरया....!!! आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खुप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सावाचा सोहळा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात. एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी 11 दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भारतातुन गणपतीच्या मुर्ती विदेशात पाठवल्या जातात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पुजा केली जाते. हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा