प्रिती.. तुझी नी माझी – भाग-४

(29)
  • 7.8k
  • 3.7k

खरेदी संपवुन निखील आणी अनु खाली पार्कीग मध्ये गाडीत सामान भरत होते, एवढ्यात, निखील ला कोणीतरी जोर-जोरात हाक मारतेय असा भास झाला. निखीलने मागे वळुन पाहिले तेंव्हा त्याच्या ऑफिस मधला मित्र- दिन्या – धावत येताना दिसला. “अरे काय झाले.. कशाला बोंबलतो आहेस एवढा.. आणी तु इथे काय करतो आहेस?”, दिन्या जवळ येताच निखील ने त्याला विचारले.“अरे माझे.. सोड.. “, दिन्याला पळाल्यामुळे प्रचंड धाप लागली होती, “श्रेया.. श्रेया..” कसा बसा धापा टाकत निखीलला म्हणाला.श्रेयाचे नाव ऐकताच निखीलने हातातल्या पिशव्या खाली टाकल्या आणी दिन्याच्या खांद्यांना धरुन त्याला गदा गदा हलवत विचारले.. “अरे काय श्रेया.. काय झाले.. तु मला निट सांगणार आहेस का?”