रामाचा शेला.. - 8

  • 10k
  • 4.5k

उदयची हकीगत सांगायची राहिलीच. ती सारी नीट सांगतो, ऐका. स्मृतिहीन उदयला सरलेचा फोटो दिसताच एकदम स्मृती आली. तो एकदम उठून उभा राहिला. त्याच्या दुबळया शरीरात बळ आले. सरलेचे जीवन त्याच्या डोळयांसमोर आले. तिचे दिवस भरत आले होते. ती कोठे असेल, तिने काय केले असेल, सारे विजेप्रमाणे त्याच्या मनासमोर आले. आणि तो एकदम मामांकडून निघून गेला. त्याला चिंता वाटत होती. सरलेची काय स्थिती झाली असेल असे मनात येऊन तो दु:खी होई. कावराबावरा होई. उदयने आपल्याला फसविले असे का तिला वाटले असेल?