सरले, कोठे ग आता जाणार? ती पुन्हा स्टेशनवर आली. मुंबईकडच्या गाडीत बसली. शून्य मनाने जात होती. मुंबईच्या समुद्रात जीव द्यावा असेही तिच्या मनात येई, नलूकडे जावे व तिला सारे सांगावे असेही तिला वाटे. परंतु उदयने खरोखरच जीव दिला असेल तर? मी का जगू? नको का जगायला? बाळासाठी नको का जगू? बाळाला मी आणीन, वाढवीन. परंतु बाळाला जग वाढवील. उदय माझी वरती वाट बघत असेल, काय करू मी?