रामाचा शेला.. - 4

  • 10.8k
  • 5.4k

आई मुलाची वाट पाहात होती. दिवाळीत आला नाही, नाताळात आला नाही. परीक्षा आहे, अभ्यास असेल, होऊ दे एकदाची परीक्षा असे द्वारकाबाई म्हणत असत. परंतु त्यांच्याच्याने आता काम होईना. त्या आजारी पडल्या. आपल्या खोलीत त्या आता पडून असत. स्वत:च थोडी भाकरी करून खात. परंतु दिवसेंदिवस त्यांना अधिक अशक्त वाटू लागले. तापही येई. ग्लानी येई. त्यांनी भावाला बोलावून घेतले. भाऊ आला होता. पोलिस खात्यातील भाऊ.