रामाचा शेला.. - 3

  • 14.5k
  • 1
  • 9.9k

झिमझिम पाऊस पडत होता. हवेत गारवा होता. सायंकाळची वेळ होती. फिरायला जाणारे बाहेर पडले होते. कोणाजवळ छत्री होती. कोणाजवळ नव्हती. विशेषत: तरुण मंडळी छत्री न घेताच जाताना दिसत होती. तोंडावरचे पाणी हातरूमालाने पुशीत होती. उदयही मधूनमधून तोंड पुशीत, केसांवरून रुमाल फिरवी. पर्वतीच्या पायथ्याच्या रस्त्याने तो जात होता. कालव्याकडे तो वळला. त्याच्या काठाने तो जाऊ लागला. तो दोनतीनदा त्या बाजूला येऊन गेला होता. परंतु इष्टदर्शन झाले नव्हते. “आज तरी सरला दिसेल का? या अशा हवेत ती फिरायला पडेल का बाहेर?